Ad will apear here
Next
जागतिक बाजारपेठेतील सॉफ्टवेअर उत्पादनांचा भारताचा वाटा आठ बिलियन डॉलर्सचा
ओंकार राय यांची माहिती
‘पुणे कनेक्ट’ परिषदेत जसप्रीत बिंद्रा यांच्या ‘द टेक व्हिस्परर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी (डावीकडून) अश्विन मेघा, अभिजित अत्रे, नितीन देशपांडे, आशुतोष पारसनीस, जसप्रीत बिंद्रा, एस. रामप्रसाद, सीमा चोप्रा आदी उपस्थित होते.

पुणे : ‘सॉफ्टवेअर उत्पादनांचा जागतिक बाजार ५०० बिलियन डॉलरचा असून, त्यातील भारताचा वाटा जवळपास आठ बिलियन डॉलर्सचा आहे. येत्या २०२५ पर्यंत तो ७० ते ८० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. ते साध्य करण्यासाठी सरकार, विविध मंत्रालये व व्यवसायातील तज्ज्ञांकडून एकत्र येऊन पोषक वातावरण तयार करण्याच प्रयत्न होत आहे,’ असे प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या ‘एसटीपीआय’ (सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कस् ऑफ इंडिया) विभागाचे महासंचालक डॉ. ओंकार राय यांनी केले.

सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे अर्थात ‘सीप’तर्फे आयोजित आठव्या ‘पुणे कनेक्ट’ परिषदेत ते बोलत होते.  

‘सीप’च्या कार्यकारी समितीचे सदस्य व पुणे कनेक्टचे प्रमुख अभिजित अत्रे, ‘सीप’चे अध्यक्ष अश्विन मेघा, उपाध्यक्ष विद्याधर पुरंदरे, ‘पुणे कनेक्ट’चे कार्यक्रम संचालक स्वप्नील देशपांडे या वेळी उपस्थित होते. 

डॉ. ओंकार राय
राय म्हणाले, ‘सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कस् ऑफ इंडिया अंतर्गत देशात २८ ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारली जात असून, त्याद्वारे माहिती तंत्रज्ञानात काम करणाऱ्या तज्ज्ञांचा मेंटॉर म्हणून एक समुह तयार केला जात आहे. या २८ ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’साठी इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय, एसटीपीआय व इतर सरकारी विभागांकडून ६०० कोटींहून अधिक रुपयांची मदत देण्यात येत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ब्लॉक चेन अशा विविध विषयांसाठी ही केंद्रे काम करतील. विशेष म्हणजे यातील प्रत्येक केंद्राचे प्रमुख या क्षेत्रातील तज्ज्ञ असतील.’

‘गेल्या दोन दशकांत भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला असून, इतर व्यावसायिक क्षेत्रांवरही या क्षेत्राचा मोठा प्रभाव आहे. आता भारतात बऱ्याच प्रमाणावर संशोधन व निर्मितीचे (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) आऊटसोर्सिंग होते. सरकारच्या धोरणांमध्ये या सगळ्याची दखल घेतली जात आहे,’  असेही राय यांनी सांगितले. 
     
या वेळी तंत्रज्ञानातील सल्लागार जसप्रीत बिंद्रा यांच्या ‘द टेक व्हिस्परर’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. ‘फ्यूचर इन द कनेक्टेड वर्ल्ड’ ही या वर्षीच्या ‘पुणे कनेक्ट’ची मध्यवर्ती संकल्पना होती. माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रातील अनेक तज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानांचा कार्यक्रमात समावेश होता. सिस्कोचे भारत व सार्क देशांमधील अध्यक्ष समीर गद्रे यांच्या व्याख्यानासह अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या आणि पुन्हा धीराने उभ्या राहिलेल्या अनमोल रॉड्रिग्स यांच्याशी गप्पांच्या कार्यक्रमाचे आयोजनही या वेळी करण्यात आले होते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZMCCH
Similar Posts
‘किर्लोस्कर’ला सर्वोत्कृष्ट व्यवसाय पुरस्कार पुणे : किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड कंपनीला यंदाचा ‘सीआयआय एक्झिम बँक सर्वोत्कृष्ट व्यवसाय’ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार पटकावणारी डीझेल इंजिन, जनरेटर्स क्षेत्रातील ही पहिली कंपनी आहे. बेंगळुरू इथं नुकत्याच झालेल्या २७ व्या राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेत ‘केओइएल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर
काँक्रीटची मजबुती मोजणारा भारतीय बनावटीचा पहिला ‘मॅच्युरिटी मीटर’ विकसित पुणे : बांधकामात वापरल्या जाणाऱ्या काँक्रीटची मजबुती मोजण्यासाठी ‘पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रीसर्च फाउंडेशन’ने (पीसीईआरएफ) संपूर्णतः भारतीय बनावटीचे ‘मॅच्युरिटी मीटर’ हे उपकरण देशात प्रथमतः विकसित केले आहे. या मॅच्युरिटी मीटरची किंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या परदेशी मॅच्युरिटी मीटरच्या किमतीच्या केवळ ३५ ते ४० टक्के इतकीच आहे
‘क्विकहील’ला ‘डीएससीआय’तर्फे पुरस्कार मुंबई : क्विकहील टेक्नॉलॉजीज लिमिटेडला ‘डीएससीआय एक्सलन्स अॅवॉर्ड २०१९’मध्ये नासकॉमच्या डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे (डीएससीआय) ‘सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट पायोनियर इन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुण्यातील ‘सिग्मापेरॉन’ ठरली सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुणे : कामाच्या ठिकाणी आपल्या विभागातील पिण्याचे पाणी संपले असेल, किंवा स्वच्छतागृहे स्वच्छ नसतील, तर आपण संबंधितांकडे तक्रार नोंदवतो आणि समस्या सोडवली जाण्यासाठी वाट पाहतो. अशा प्रसंगांमध्ये जाणारा वेळ आणि होणारी गैरसोय टाळून साध्या ‘क्यू-आर कोड’च्या माध्यमातून आपली गरज व्यवस्थापकांपर्यंत पोहोचवणाऱ्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language